ऊस उत्पादनाचा राजा-ऊस लागवड-एकरी 100 टन Sugarcane Farming

कृषिरत्न डॉ. सजीव माने, सुरेश कबाडे, अतुलनाना माने पाटील, रुद्रकु मार हलाप्पनवार आणि सुधीर कट्टी,डॉ. अंकुश चोरमुले या सर्वांनीआधी स्वतःच्या शेतात एकरी १००-१५० टन ऊस काढण्याचे प्रयोग केले व आजही करीत आहेत.

डॉ. संजीव माने Dr.Sanjiv Mane

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संजीव माने यांनी १९९६-९७ मध्ये पहिल्यांदा जैनच्या ठिबक संचावर शंभर टनाचा प्रयोग केला होता. तेव्हा शिंदे मळ्यात शेतकरी विकास मंच स्थापन केला व ‘शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास’ हे त्याचे ब्रिदवाक्य ठेवले. २००१ पासून लखपती योजना चालू के ली. तेव्हा ऊसाला टनाला एक हजार रुपये भाव होता. शंभर टन ऊस पिकवा आणि स्वत:च लखपती व्हा अशी योजना होती. आता माने यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटसअपचे ११० ग्रुप असून प्रत्येक ग्रुपमध्ये २५० या प्रमाणे जवळपास २५ ते २६ हजार शेतकरी थेट आणि चार लाख शेतकरी अप्रत्यक्षरित्या जोडले आहेत. एकरी १६८ टनापर्यंत माने गेले असून सध्या ४ ठिकाणी जैन कंपनीच्या मदतीने ते दोनशे टनाचा प्रयोग करीत आहेत.

श्री. सुरेश कबाडे (मु. कारंदवाडी, ता. वाळवा, जि. सांगली). -Shri Suresh Kabade

हे २००५ सालापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ‘महाराष्ट्र ऊस उत्पादक ग्रुप’ या नावाने त्यांनी संघटना स्थापिली असून
‘होय आम्ही शेतकरी’ हा त्यांचा फे सबुकचा ग्रुप आहे. के ळी, ऊस आणि भाजीपाला यात मिळून १० लाख शेतकरी (त्यातले ५ लाख
ऊसाचे) त्यांच्याशी जोडलेले आहेत. शेतावरून ते थेट शेतकऱ्यांना लाईव्ह मार्गदर्शन करतात. उदा. ऊसाची लागण पद्धत, खते टाकणे,खांदणी-बांधणी वगैरे. त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच विषय समजतो .कबाडे यांनी गेल्या वर्षी १३० टनापर्यंत एकरी ऊस काढला आहे. राजारामबापू साखर कारखान्यातील तीन हजार शेतकऱ्यांनी मागीलवर्षी एकरी शंभर टनांपेक्षा जास्त उत्पादन काढले असून त्यांना श्री.कबाडे यांचे मार्गदर्शन आहे.

श्री.अतुल माने पाटील (रा. उंदरगाव ता. माढा जि.सोलापूर) संस्थापक महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ.

हे महाराष्ट्र राज्य ऊस ऊत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी केलेल्या नविन प्रयोगांची
माहिती राज्यातील इतर ऊस उत्पादकांना व्हावी म्हणून संघाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी एक व्यासपीठ निर्माण के ले आहे. या
ऊस उत्पादक संघाद्वारे शेतीचे नियोजन सहकार्य व मार्गदर्शनातून प्रगतशिल प्रयोगशिल ऊस उत्पादकांची आदर्श चळवळ निर्माण होईल असा त्यांना विश्वास आहे. याचा फायदा इतर सामान्य ऊस उत्पादकांना होऊन त्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल.शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य स्विकारून शेतीच्या विकास कामामध्ये या ऊस उत्पादक संघाची भूमिका महत्वपूर्ण आहे.

श्री.सुधीर कट्टी (बेलाड, बागेवाडी, कर्नाटक)

हे ७०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांनी स्वत: ४२ गुंठ्यातून १०९ टन ऊस काढला आहे आणि आता २.१० एकरातून २५० टन ऊस काढण्याचा प्रयोग सुरू आहे. ऊसाच्या लागणीसाठी ८०० किलोपेक्षा जास्त बियाणे लागतच नाही. पण शेतकरी, अडीच ते तीन टन बियाणे वापरतात. तीन फूट अंतर ठेवतात. त्यापेक्षा ५ फू ट अंतर ठेवले तर ऊस उत्कृष्ट येतो. या तज्ज्ञांनी आत्तापर्यंत ऊसावर १४ वेबिनार केले आहेत. यू ट्यूबवरती ते पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. नवीन बदल आत्मसात केला पाहिजे.

डॉ. अंकुश चोरमुले

हे वाळवा – आष्टा जि-सांगली येथील शेतकरी असून त्यांच्या गन्ना मास्टर या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन करतात.

गन्नामास्टर एक जैविक कृषि-सूत्रीकरण कंपनी आहे.त्यांच्याबद्दल अधिक माहिती खाली दिली आहे.

पिकांची देखभाल आणि पोषण यांमध्ये विशेषज्ञता असलेली आमची उत्पादने आणि सेवा शेतकऱ्यांना खर्च बचत प्रदान करताना लवचिक, उच्च गुणवत्ता आणि आरोग्यकर पिके वाढवण्यावर केंद्रित आहेत. आम्ही फक्त उत्पादने विकत नाही. आम्ही मूल्यवर्धित सेवांचा समूह, विक्री-नंतरचा पाठबळ आणि अगदी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजन करतो. या सर्व गोष्टींमधून आम्ही शेतकरी उच्च गुणवत्तेची उत्पादनक्षमता, उत्पादकता आणि लाभांची नवीन पहाट आणतील याची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम करतो.

श्री.रूद्रकुमार हलाप्पनवार (सादलंगा, जि. बेळगाव)

यांनी २०१४ मध्ये एकरी १०३ टन ऊस काढून दाखविला. सहा बाय चार वर २६५ ही व्हरायटी लावून प्रती चौरस फू टात २० ते २२
ऊस घेतले. पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दक्षिणोत्तरलागवड केली. साधारणपणे वारा पूर्व-पश्चिम दिशेने वाहतो. जास्त
वारे ऊस पिकात शिरू नये आणि पिकावर सावली पडू नये म्हणून लागवड दक्षिणोत्तर करतात. ऊस पीक रात्री ऑक्सिजन घेते आणि दिवसा कार्बनडायऑक्साइड घेते. पिकात जास्त वारे खेळले नाही तरश्वासोच्छवासाची क्रिया अधिक चांगली होते. झाडाच्या मुळांना पाणी दिले पाहिजे. एका वेळेला दिलेले पाणी १२ ते १३ इंचापर्यंत जाते. मुळेसुद्धा श्वासोच्छवास करीत असतात. जास्त पाणी दिल्याने ही क्रिया बंद पडते. म्हणून ठिबक संचाने पाणी दिले पाहिजे. पण शेतकरी अजूनही याकडे दर्लक्षु करतात. रूद्रकु मार हलाप्पनवार शेतकऱ्यांना नेहमी एक प्रश्न विचारतात, घरात पाणी पिताना ग्लासने की हंड्यानेपिता. ग्लासने पाणी पिणे हे ऊसाचे ठिबक आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE