फळांना कवर म्हणजे नुकसानाला आवर! Fruit Cover – Fruit Protection

फळावर सूर्याची किरणे थेट पडली किंवा कडक उन्हाचा मारा फळांवर झाला तर फळांवर काळे डाग पडण्याचा व
त्यांची गुणवत्ता खराब होण्याचा धोका असतो याकरिता जास्तीत जास्त काळ फळ सावलीत कसे राहिल आणि थेट
सूर्यकिरणांना सामोरे जाणार नाही याची काळजी व दक्षता शेतकरी घेतात.यासाठी केळीच्या घ़डाला प्लॅस्टिक पिशवीचे
आवरण घातले जाते. द्राक्षाचे घड वेलीच्या दोन्ही बाजूने पाच-पाच तारा लावून त्यावर सोडले जातात व ते पानांच्य खाली कसे राहतील ते पाहिल जाते. त्यामुळे द्राक्षघड लगेच पिवळे न पडता जास्त काळ हिरवे राहतात आणि उशीरा काढायला येतात.त्यामुळे द्राक्षाची ब्रिक्स वाढून ती खायलाही गोड लागतात.बरेच शेतकरी हल्ली पपईच्या झाडाला जिथे पपया लागल्या आहेत त्याच्या भोवती पोती गुंडाळतात. त्यामुळ पपई डागी बनत नाही व काळीही पडत नाही. बऱ्याचदा फळांवर किडे, डास, माशा व जीवजंतूचा हल्ला होऊन त्याचे डागही पडतात. यापासून फळांचा बचाव करण्यासाठी वरून आवरण घातले जाते. हल्ली पेरूच्या झाडावर जे पेरू लागतात त्याला थर्मोकोलची जाळी घालतात आणि वरून त्यावर प्लॅस्टिकची पिशवीही चढवितात त्यामुळे फळाची प्रत, चकाकी उत्तम राहते. या संरक्षणाकरिता थोडा खर्चवाढत असला तरी फळांना व मालाला जो गुणवत्तेमुळे जास्तीचा भाव मिळतो त्यातून हा खर्च सहजपणे वसूल होऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढील काळात फळांच्या संरक्षणाची अशी उत्तम व्यवस्था करणे गरजेचे आह.

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE