अक्षय ( Renewable) ऊर्जेसाठी जागतिक ऊर्जा क्षेत्रे ऊर्जा संसाधनांच्या शाश्वतता आणि विविधीकरणाच्या महत्त्वपूर्ण आव्हानाला तोंड देत आहेत. यविषयावर अधिक संशोधन आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.
बांबूमध्ये अनेक इंधन वैशिष्ट्ये आहेत. बांबूचे उच्च उष्णता मूल्य (HHV) बहुतेक कृषी अवशेषांपेक्षा जास्त आहे.
बायोमास ऊर्जेसाठी इंधन म्हणून लाकूड, कोळसा आणि शेतीचे अवशेष समाविष्ट केले जातात. जे घटक निसर्गात अक्षय आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंग साठी कारणीभूत ठरणार नाहीत.
१. बांबू चा कोळशासाठी वापर –
बांबूमध्ये 50% कार्बन असतो ज्यामुळे त्याचे रूपांतर कोळशात होण्याची शक्यता असते.
बांबू उत्कृष्ट कोळसा बनवतो जो उष्णता निर्माण करण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी तसेच औद्योगिक इंधनाच्या गरजा भागवू शकतो.
त्याचप्रमाणे सक्रिय कार्बनसारखे उत्पादन तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला जाऊ शकतो.
अलिकडच्या काही काळात बांबूचा कोळसा झपाट्याने विकसित होत आहे. परंतु त्याची अजूनही फारशी माहिती लोकांना नाही.
उच्च दर्जाच्या कोळशाच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे जंगलातील लाकूड झपाट्याने कमी झाले आहे.
बांबूचे कापणी चक्र लहान असते कारण ते खूप वेगाने वाढते. त्यामुळे बांबूच्या कोळशामुळे जंगल नष्ट होत नाही.
बांबू कोळशाची गुणवत्ता ही उच्च दर्जाच्या लाकडी कोळशासारखी आणि कोळशापेक्षा चांगली असते.
बांबूच्या कोळशाचे उष्मांक इतर कोळशापेक्षा जास्त असतो. राखेचे प्रमाण कमी असते, या कारणांमुळे बांबूला कोळशात रूपांतरित करण्याची कल्पना अक्षय ऊर्जा निर्मिती साठी एक चांगली संधी आहे.
एक एकर लागवड केलेल्या बांबूपासून 14 टन कोळशाचे उत्पादन होऊ शकते. परंतु सक्रिय कार्बन तयार करण्यासाठी कोळशाची गुणवत्ता गॅसिफिकेशन आणि पायरोसिसच्या प्रक्रियेद्वारे मिळवता येते ज्यामुळे सक्रिय चारकोल तयार करण्यासाठी योग्य 5-6 टन उच्च-गुणवत्तेचा कोळसा मिळू शकतो.
२.बांबू पासून बायो-इथेनॉल निर्मिती –
अचूक शेती केली असल्यास बांबू पासून सेल्युलोसिक इथेनॉल उत्पादन दर वर्षी 10,000 ते 12,000 लिटर प्रति एकर मिळू शकते
सध्या इथेनॉल स्रोत हा उसापासून आहे, जिथे एक एकर उसापासून फक्त 500 लिटर उत्पादन मिळते तर उसाप्रमाणे बांबूची लागवड केल्यास 10,000 लिटर इथेनॉल मिळू शकते.
३.बांबू पासून बायो-सीएनजी-
अनेक इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.
CNG चा वापर त्याला नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
बांबू चे बायो-गॅसमध्ये परिवर्तन केले जाऊ शकते. त्यातून प्रक्रिये द्वारे बायो-सीएनजी ची निर्मिती केली जाऊ शकते.
8 किलो. बांबू बायोमासपासून 1 किलो CNG उत्पादन होऊ शकेल.
४. बांबूपासून विज निर्मिती –
बांबूपासून वीज निर्माण होते.
200 एकर (80 हेक्टर) बांबू अनेक वर्षे 1MW (1 MW/तास, 7200 MW तास/वर्ष) वीज निर्मिती करू शकतो.
५. बांबूपासून बायो-तेल –
Phyllostachys edulis (250-1000 mg/kg शरीराचे वजन प्रतिदिन) पासून काढलेले बांबू शूट ऑइल चे कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी लिपो-प्रोटीन (LDL), तसेच सीरम ट्रायसिलग्लिसेरॉल, फायटोस्टेरॉल आणि लिपोप्रोटीन लिपेज कमी करण्यासाठी डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे.
बांबू तेल, बायोटिन आणि कोलेजनसह केसांना मजबूत, निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
बांबू उत्पादन विविध अक्षय ऊर्जा प्रकारासाठी वापरले गेल्यास पर्यावरणाचा वाढत ऱ्हास रोखण्यास मदत होऊ शकते.