गांडूळ खत-निर्मिती-वापर-सर्वकाही Vermicompost Marathi

गांडूळ खत हे सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. सेंद्रिय शेती कडे वळताना त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

रासायनिक खतांचा वाढलेला वापर आणि त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत चालली आहे. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा प्रचंड हानी होत आहे.
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा (vermicompost)असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते.

एपिजिक व अ‍ॅनेसिक या जातीची गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात.
त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत.

गांडूळखताचे फायदे-

१.जमिनीचा पोत सुधारतो.
२.मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल होतो.
३.जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
४.जमिनीची धूप कमी होते.
५.बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
६.जमिनीचा सामू (पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
७.गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
८.गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
९.जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत वाढ होते.
१०.गांडुळ खतामध्ये नत्र १.८ ते २.०%, स्फुरद ०.६५ ते ०.७५ आणि पालाश ०.५० ते ०.६० % प्रमाण असते.

गांडूळ खत निर्मिती व्यवसाय-

या व्यवसायाविषयी माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा

https://youtu.be/0g4djpx17FQ?si=TYhohyUZMDSdEg-B

गांडूळखत तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत.

१.ढीग २.खड्डा

मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी.
या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी.
निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा.
गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.

१.ढीग पद्धत

ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत.

साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

२.खड्डा पद्धत

या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.

गांडूळ खत (gandul khat) तयार होण्यास लागणारा कालावधी –

गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळ खताची किंमत (gandul khat price)-

साधारणता गांडूळ खताची दहा किलोची बॅग आपल्याला 150-160 रुपयांपर्यंत मिळते.

गांडुळखतामध्ये असणारे अन्नद्रव्याचे प्रमाण हे कमी किंवा जास्त असू शकते कारण हे खत करतांना वापरले जाणारे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि तयार करण्याची पध्दत यावर अवलंबून असते. होते. सरदचे गांडुळ खत कोणत्याही प्रकारच्या जमिनी, पिके, आणि हवामानात अत्यंत उपयोगी आहे. म्हणून गांडुळ खत एक उत्तम सेंद्रिय खत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE