राऊंडअप तणनाशकाने कॅन्सर-Roundup Herbicide causes Cancer

राऊंडअप तणनाशकाने कॅन्सर- दोन हजार कोटींच्या भरपाईचा आदेश

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये एक निर्णय दिला असून त्यात ‘राऊंडअप’ या तणनाशकामुळे माणसांना कॅन्सर हा रोग होतो हे मान्य केले आहे. कॅलिफोर्निया राज्यातील उवेन जॉन्सन या शेतकऱ्याला या तणनाशकांमुळे कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्याने न्यायालयात केस दाखल केली होती. ‘राऊंडअप’ या तणनाशकामध्ये ग्लायकोसेट हे रसायन असते आणि त्यामुळे कॅन्सर होतो हे मान्य करून न्यायालयाने श्री. जॉन्सन यांना राऊंडअप तणनाशक बनविणाऱ्या कंपनीने दोन हजार कोटी रूपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही या तणनाशकात कॅन्सरजन्य घटक असल्याचे मान्य केले आहे. २००० सालीच संघटनेने तसे जाहीर केले होते. तरी देखील शेतकरी हे तणनाशक वापरतच होते.

भारतातही ‘डर्टी डझन’ या शिर्षकाखाली १२ कीडनाशके वापरण्यास प्रतिबंध करण्यात येऊन आता ३०-४० वर्षे झाली आहेत तरी देखील शेतकरी ही औषधे व कीडनाशके वापरताना दिसतात. भारतातही दरवर्षी जवळपास १५ कोटी टन ग्लायकोसेट विकले जाते अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमांनी जाहीर केली आहे. अमेरिकेतल्या ८०० शेतकऱ्यांनी राऊंडअप या तणनाशकामुळे कॅन्सर होतो हे आता मान्य करून त्याविरूद्ध सरकार व न्यायालयात धाव घेतली आहे.

मानवी आरोग्याला अपायकारक असणारी कीडनाशके व बुरशीनाशके किती प्रमाणात व कशी वापरली पाहिजेत याबाबतचे कडक धोरण सरकारने ठरविले पाहिजे आणि त्याबाबतचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE