Aromatic Farming-लेमनग्रास शेती-कमी खर्च जास्त फायदा-नवे पीक..!

Lemon Grass Farming In Marathi

 कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती होते ती म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने !

शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना लेमन ग्रासने नवा मार्ग दाखवला आहे. या शेतीतून अनेकजण भरघोस उत्पादन करत खुप पैसा कमवत आहेत. जर शेतीत निरनिराळे प्रयोग केले तर बेरोजगारी कमी होईल यात शंका नाही आणि शेतीकडे पाहण्याची नजर बदलेल. लेमन ग्रास शेती ही एक व्यावसायिक शेतीच्या रुपाने उभरत आहे. विशेष म्हणजे फार कमी खर्चात ही शेती केली जाते.

आयुर्वेदिक औषधे आणि परंपरागत सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुगंधी वनस्पतींची लागवड आता देशात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. लेमनग्रास, पेपरमिंट, वासळेपूर्ण पुष्पांची रोपे यांसारखी सुगंधी वनस्पती कमी पाण्यात आणि कमी जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांचे उत्पादन चांगले दाम मिळवून देते. म्हणून, पारंपारिक शेतीसोबतच सुगंधी वनस्पतींची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवा! आंतरराष्ट्रीय बाजारपेठही सुगंधी पदार्थांची मोठी मागणी आहे! अमेरिका, युरोप आणि आखाती खाडी देश भारताच्या सुगंधी तेलांचे प्रमुख आयातदार आहेत. वेगवेगळ्या हवामानात येणारे सुगंधी पीक आपण लावू शकता, त्यामुळे तुमच्या शेतीला जागतिक बाजारपेठ मिळण्याची संधी आहे!

लेमन ग्रास ही एक औषधी वनस्पती आहे. लेमन ग्रास चा वापर कॉस्मेटिक, डिटर्जंट, आणि औषधांमध्ये केला जातो. लेमन ग्रास ची शेती करून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता. लेमन ग्रास हे लागवडीनंतर चार महिन्यांमध्ये तयार होते. त्यापासून बनवलेल्या तेलाला बाजारात चांगला भाव मिळतो.  विशेष म्हणजे लेमनग्रास ची शेती करताना कुठल्याही प्रकारच्या खताची ची गरज असत नाही. त्यामुळे लेमन ग्रास ची शेती ही खूप फायद्याचे असते.

 जमीन कशी असावी – 

सर्व प्रकारच्या जमिनीत याचे उत्पादन होत असते. परंतु पाणी धरून ठेवणारी माती या पिकासाठी अयोग्य आहे. जिथे मातीची धूप जास्त होते, तशा उतार असलेल्या भागात याची लागवड केल्यास मातीची धूप थांबते. हे ६.५ पीएच. एच पर्यंत वाढू शकते. हे पर्वताच्या उतार असलेल्या वांझ प्रदेशातही म्हणजे जेथे कोणती पीके घेता येत नाही तेथे हे पीक घेता येते.

लागवड करण्याची वेळ 

मान्सून सुरू झाला की, आपण याची लागवड करु शकता  या पिकाच्या लागवडीसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा अधिक चांगला असतो.

रोपांची कशी कराल लावणी – एका ओळीत म्हणजे वाफ्यांमध्ये साधरण ५० सेंटीमीटर ते ७५ सेंटीमीटरचे अंतर ठेवावे. रोपांमध्ये साधरण ३० ते ४० सेंटीमीटरचे अंतर ठेवावे.

सिंचन – या पिकाला सिंचनची इतकी गरज नसते. परंतु उत्पादन अधिक हवे असल्यास सिंचन करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, १५ दिवसांच्या फरकाने सिंचन करावे.

कापणी – तीन महिन्यानंतर कापणी करावी. 

जाती : लागवडीसाठीसीकेपी- २५,ओडी – १९,ओडी – २३,ओडी – २५, ओडी- ४४०, आरआरएल १६, जीआरएल १, प्रगती,प्रमाण, कावेरी, कृष्णा,  निमाया जातींची निवड करावी. सीकेपी-२५ या जातीची  पाने गर्द हिरव्यारंगाची, कमी रुंदीची, पाण्याचा ताण सहन करणारी व त्याचप्रमाणे सिट्रॉलचे प्रमाण जास्त असणारी आहे.

उत्पादन- याची लागवड केल्यानंतर चार महिन्यांमध्येच हे पीक तयार होते. औषधांसोबतच या पिकापासून बनवलेल्या तेलाला देखील बाजारात चांगली मागणी आहे. या पिकाच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकासाठी कोणत्याही प्रकारच्या खताची आवश्यकता भासत नाही. आणि हे पीक एकदा पेरले की पाच ते सहा वर्षापर्यंत ते चालते. याची पेरणी फेब्रुवारी ते जुलै च्या दरम्यान करता येते. एकदा याची पेरणी केली की, पाच ते सहा वेळा याची कापणी करता येते. यापासून तयार केल्या जाणाऱ्या तेलाची किंमत हजार ते दीड हजार रु लिटर अशी असते. एका एकरातून साधारण ५0 ते ६0  kg तेल निघते.

सुगंधी वनस्पतींचे प्रक्रिया

सुगंधी शेतीमध्ये पीक लावणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांची प्रक्रिया देखील महत्वाची असते. सुगंधी तेले, ज्याचा उपयोग औषधी आणि सौंदर्य पदार्थांमध्ये केला जातो, ती या प्रक्रियेतून मिळवली जातात.ही पारंपारिक पद्धत आहे. यामध्ये वनस्पतींचे पाने, खोड किंवा फुले पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवली जातात आणि वाफ आल्यावर वाफेतून सुगंधी तेले वेगळे केले जाते.

उत्पन्न- 

गणिती  हिशोब करायचा झाल्यास याच्या लागवडीसाठी ३० ते ४० हजार रु. खर्च येतो आणि एका वर्षात ३ ते ४ वेळा याची कापणी करता येते. म्हणजे साधारण वर्षाकाठी १ ते दीड लाख रु. इतके उत्पादन या पिकातून मिळते. याच्या लागवडीसाठी विविध अनुदान योजना उपलब्ध आहेत.या अशा सुगंधी वनस्पतीच्या यशस्वी शेतकऱ्याचा व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकाल.

आजच्या काळात शेतीत टिकून राहण्यासाठी पारंपरिक शेती बदलाविच लागेल ..!!

त्यासाठी तुम्ही आमचे इतर नवीन पिकविषयीचे लेख नक्कीच वाचा.https://thekisancollege.com/category/crop-information/

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE