Green Manure-हिरवळीचे खत-वाढवेल जमिनीची प्रत

एकात्मिक खत व्यवस्थापन (Integrated Fertilizer Management) करत असताना हिरवळीची खते (Green manure) फार महत्त्वाची आहेत. जमिनीचे आरोग्य (soil health) आणि उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची गरज आहे. जमिनीतील नत्रासोबत सुक्ष्म अन्नघटकांच्या पुरवठ्याबरोबरच जमिनीचे भौतिक गुणधर्मही सुधारण्यास मदत करतात. हिरवळीचे पिक हलक्या ते भारी, पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेऊ शकतो.

या पिकांमध्ये आंतर मशागत, तण नियंत्रण आणि ओलिताची आवश्यकता नसते.

पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीत गाडले जाते.

हिरवळीचे खत प्रामुख्याने दोन प्रकारे मिळते :


१. पिके शेतात वाढवून फुलोऱ्यापूर्वी जमिनीत मिसळतात.
उदाहरणार्थ –
शेंगवर्गातील पिके ताग,गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम

२.पडीक जमीन, शेतातील बांध आणि जंगलात उगवलेल्या वनस्पतींमधून हिरवी पाने (डहाळ्यांसह)
गोळा करून शेतात गाडल्या जातात.

उदाहरणार्थ –
गिरिपुष्प ,शेवरी ,करंज ,
सुबाभुळ ,टाकळा

या पिकांपासून बनविलेले १ टन हिरवळीचे खत १.८ ते ३.० टन शेणखताच्या बरोबर असते.

हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती –

१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील तिथे त्याचे खत तयार करता येईल.जर ही पिके बाहेरून आणली असतील तर ती जमिनीवर पसरवून नांगरून गाडून टाकावीत.
या हिरवळीच्या ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .

२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेउन नांगराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे . संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .
हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.

३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .

हिरवळीच्या खताची पूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

हिरवळीच्या खतांचे फायदे

  • जमिनीची जलधारणा क्षमता वाढते.
  • जमिनीची धूपही कमी होते
  • यामध्ये ह्यूमस असते, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  • या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.
  • लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण आणि अझोटोबॅक्टर सारख्या जीवाणूंचे प्रमाण वाढते.
  • जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. सेंद्रिय खतांच्या वापर आरोग्याच्या आणि जमिनीच्या दृष्टीने फायदेशर आहे .

READ MORE-MAHA-DBT Farmer Schemes शासनाकडून मिळणारे अनुदान सोडू नका…!!

WhatsApp Group Join Now
Instagram Page Follow Now

Leave a Comment

error

Follow & Share for More

Share
FOLLOW US
SUBSCRIBE