आज आपण ऊसावर येणाऱ्या हुमनी कीडीसंबंधी आपल्याशी बोलणार आहे. कीटकनाशक वापरुनही हुमनीचा बंदोबस्त होत नाही आणि होणारही नाही. कारण नुकसान झाल्यावर कळते हुमनी आली होती. मग कीटकनाशक फवारुनही काही उपयोग होत नाही. ७० मि.मी. पाऊस पडला की जमिनीतून भुंगे बाहेर पडतात. शेताच्या बांधावर बाभूळ, कडूनिंब, इलायची चिंच यावर ते भुंगे जातात. सकाळी पावणे सात ते रात्री दहा वाजेपर्यंत हे भुंगे बाहेर हिडत असतात. झाडावर जाऊन थोडा वेळ थोडासा पाला खातात. सर्व भुंगे एकाच वेळी बाहेर पडतात. भुंगे गोळा करुन मारणे ही पहिली पायरी आहे. जून महिन्यात सरी भरुन पाऊस पडला तर हुमनी येत नाही.
सोयाबीन, भात, भुईमूग, ऊस या पिकांचे हूमनी नुकसान करते. हुमनी मुळीच्या सानिध्यात असते. त्यामुळे कीटकनाशक फवारण्याची पद्धत बदलावी लागणार आहे. आले, हळद, कांदा याला सुद्धा हूमनी लागते. मोठा पाऊस पडला तर हुमनीचा आपोआप बंदोबस्त होतो.
हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उस उगवणीत ४०% तर उस उत्पादनात १५ ते २०% नुकसान होते.
उपाय:-
१) ऊसाला पाणी लागत नाही. ओलावा लागतो. पाचट तो ओलावा धरुन ठेवतो. पाचट कुजविणारे जीवाणू सर्वत्र विकत मिळतात, पाचट पूर्ण कुजली असेल तर हुमणी चा प्रादुर्भाव कमी होतो.
२)जैविक नियंत्रण- परोपजीवी बुरशी मेटाऱ्हिझम ऍनिसोप्लीचा वापर प्रभावी ठरतो.
प्रमाण-
१ किलो मेटाऱ्हिझम / २०० लिटर पाण्यात मिसळून आठवड्यात २ वेळा फवारावे.
याविषयी अधिक माहितीसाठी खालील YouTube Video पूर्ण पहा
३) १५ लिटर पाण्यात ३० मिली कीटकनाशक मिसळा व ते झाडावर फवारा. भुंगे पाने खाऊन मरुन पडतात .
४) ८ ते १० टक्के हुमनीचे प्रमाण बगळे कमी करतात. मात्र कुठलाही पक्षी मेलेली अळी खात नाही. हे बगळे नांगरट किंवा पाळीच्या वेळेला वर आलेले भुंगे खातात.
५) शेतकऱ्यांनी कीटकनाशक मिसळल्याशिवाय शेतात कोणतेही सेंद्रीय खत टाकायचे नाही हे लक्षांत ठेवावे .
६) खरीपात चिखलणी करुन भात लावा आणि नांगरट सकाळी सात वाजता किंवा सायंकाळी चार वाजता करा. पक्षी येऊन सगळे जीवजंतू व कीडे खातात.
सेंद्रिय शेतीच्या अधिक माहितीसाठी आपले इतर ब्लॉग वाचा.Green Manure-हिरवळीचे खत-वाढवेल जमिनीची प्रत